Ad will apear here
Next
सनी पवार मराठी चित्रपटात
पुणे : ‘लायन’ या हॉलिवूड चित्रपटात सनी पवार हा मराठमोळा बालकलाकार मुख्य भूमिकेत झळकला होता. हाच सनी आता आगामी ‘अ ब क’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत असून, ‘हरी’ ही व्यक्तिरेखा साकारताना आपणाला तो दिसेल.

‘लायन’ चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. सत्यघटनेवर आधारित असलेल्या चित्रपटात सनीने ‘शेरू’ ही व्यक्तिरेखा साखरली होती. त्याने साकारलेली शेरूची भूमिका जगभरात गाजली होती व हा चित्रपट ऑस्करवारीत असल्याने सनीच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. त्याला अभिनयासाठी ‘दी रायझिंग स्टार’ हा पुरस्कार देऊन काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्या वेळी बराक ओबामा, रॉक, सचिन तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले होते.

सनी सध्या चौथीमध्ये शिकत आहे. ग्रॅव्हेटी एंटरटेन्मेंट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर कुलकर्णी निर्मित असलेल्या ‘अ ब क’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमर शेडगे हे असून, लेखन आबा गायकवाड यांचे आहे. चित्रपटाची गीते गुरू ठाकूर यांनी लिहिली असून, सरकार राज, रक्तचरित्र, भूत अशा अनेक चित्रपटांचे संगीतकार बापी-तुतल हे ‘अ ब क’ला संगीत देणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारविजेते कॅमेरामन महेश आणे चित्रपटाचे कॅमेरामन असून, सनी पवारसह तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी असे अनेक दिग्ग्ज कलावंत या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य असे, की हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, तेलुगू अशा पाच भाषांत निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस पार्श्वगायन करणार आहेत. चित्रपटाचे निर्माते मिहीर कुलकर्णी व दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी ही माहिती दिली.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZTMBE
Similar Posts
सामाजिक विषयावरील ‘अ ब क’ या चित्रपटाचा शुभारंभ पुणे : ग्रॅव्हिटी एंटरटेन्मेंट व गोल्डन ग्लोब प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला. या प्रसंगी ‘लायन’फेम सनी पवार याचे आजोबा भीमराव पवार, चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language